आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPDATE महाराष्ट्र: अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे काढा अन्यथा शिक्षा भोगा-हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतापगड - फाइल फोटो - Divya Marathi
प्रतापगड - फाइल फोटो
मुंबई - प्रतापगडाच्या खाली अफजलखनाची कबर असलेल्या ठिकाणी व त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांचा विळखा झालेला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनीवणीदरम्यान हायकोर्टाने लवकरात लवकर ही अतिक्रमणे काढण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. वारंवार आदेश देऊनही पालन होत नसेल तर अशा अधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्याचा इशारा हायकोर्टाने दिला आहे. 

काय झाले सुनावणीत.. 
- हायकोर्टाने यापूर्वीच दिले होते अतिक्रमणे हटवण्याचे आदेश.
- न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नसल्याने कोर्टात दाखल करण्यात आली होती, अवमान याचिका. 
- याचिकेदरम्यान अतिक्रमणे वन विभागाची मालकी असलेल्या जागेवर असल्याचे सांगण्यात आले. 
- न्यायालयाने त्वरित अतिक्रमणे काढण्याचे आदेश वनविभागाला दिले. 
- अधिकारी अतिक्रमणे काढत नसतील तर त्यांची रवानगी तुरुंगात रवानगी करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला. 
- अतिक्रमणे काढण्यासाठी दोन आठवड्यांत न्यायालयासमोर एक कार्यक्रम सादर करण्याचा आदेश देण्यात आला. 
 
पुढे वाचा, जळगावात निवडणुकीच्या तोंडावर दारु जप्त..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...