आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPDATE महाराष्ट्र: कोल्हापूरातून माजी मंत्री एन.डी. पाटील यांच्या घरासमोरुन कार पळवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - माजी मंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांची कार चोरीला गेली आहे. कोल्हापुरातील त्यांच्या घराबाहेर उभी असलेली कार चोरट्यांनी पळवल्याचे पोलिस तक्रारीत नोंदवण्यात आले आहे. 
 
येथील रुईकर कॉलनीमध्ये एन.डी.पाटील यांचे घर आहे. घरासमोर त्यांची कार उभी केलेली होती. 13 फेब्रुवारीला रात्री उशीरा किंवा 14 फेब्रुवारीला पहाटे कार चोरीला गेली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरट्यांनी ड्रायव्हरच्या बाजूची काच फोडून बनावट चावीच्या आधारे गाडी चोरली असल्याची तक्रार शाहुपुरी पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. ड्रायव्हर नीलेश नकाती याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम 379 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
 
एन. डी. पाटील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मेहुणे आहेत. 
 
पुढील स्लाइडवर वाचा,
> 40 हजार रुपये लाच स्वीकारताना महिला अधिकारी चतुर्भूज
> पुणे ATS ची कारवाई: रिव्हॉल्वर-देशीकट्टा बाळगणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...