आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Vidhansabha Election 2014 Ajit Pawar News In Marathi

तुरुंगात घालायला मोगलाई आहे काय? अजित पवार यांचा विनोद तावडे यांना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शासनानेकायदेशीरपणे सर्व गोष्टी केल्या असताना आम्हाला तुरुंगात टाकण्याची भाषा विनोद तावडे करत आहेत. ही काय मोगलाई आहे काय, अशा शब्दात राष्ट्रीवादीचे नेते अजित पवार यांनी आपली भूमिका कोल्हापुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
या सगळ्याबाबत चितळे समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करण्यात आला. सर्व माहिती जगजाहीर आहे. परंतु ‘खोट बोल पण रेटून बोल’ अशी विरोधकांची भूमिका असल्याचे पवार म्हणाले. हाच खोटेपणा करणाऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाऊदला भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दाऊदला ते आणू शकले नाहीत.
आम्ही १४४ जागांवर ठाम आहोत. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. राष्ट्रवादीचे आमदार जास्त आले तर २००४ ची पुनरावृत्ती करता मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.