आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahrashtra Home Minister R.R.Patil Commnet On BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडेंच्या मृत्यूची चौकशीची मागणी केल्याने तिकीट कापले : शेंडगे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - भाजपहा पक्ष राहिला नसून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची प्रायव्हेट कंपनी बनला आहे. त्यात बहुजन समाजाला स्थान नाही, अशी टीका माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी कवठे महांकाळ येथील सभेत केली.
भाजपचे जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आबा म्हणाले, ‘राज्यात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सांगतील, तेच भाजपने ऐकायचे, अशी स्थिती आहे. तर सांगलीात नीता केळकर, सुधीर गाडगीळ हे भाजपचे मालक झाले आहेत. बहुजन समाजाला या पक्षात स्थान नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पक्षा शुद्ध करून घेवून त्यांना उमेदवारी बहाल केली जाते. त्यामुळे अशा पक्षाचे नामोनिशान मिटवण्यासाठी जनतेने सज्ज रहावे’, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडगे हे घर चुकले होते. मुंडेंवर विश्वास ठेवून ते भाजपमध्ये गेले; पण मुंडेंच्या मागे त्यांचे तिकीट कापण्यापर्यंत पक्षाची मजल गेली, असेही पाटील म्हणाले.

‘बहुजन समाजाचे नायक गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानेच मला उमेदवारी नाकारण्यात आली. मुंडेंनंतर भाजपमध्ये खमक्या नेता उरला नाही. मुंडे समर्थकांना खिंडीत गाठून जिरवण्याचे राजकारण भाजपमधील जातीयवादी मंडळी करत आहेत,’ असा आरोप भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला. शेंडगे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

‘धनगर आरक्षणाचा प्रश्न महिन्यात निकाली काढतो अशी घोषणारे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे इतर नेते आता या विषयावर बोलतही नाहीत’, अशी टिका करताना प्रकाश शेंडगे म्हणाले, ‘धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आड खरे तर भाजपच येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला; मात्र भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून भाजप मात्र धनगर समाजाची दिशाभूल करत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.