आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Majer Accident In Satar District, 8 Killed For Container

भीषण अपघात: कंटेनर खाली दाबले गेले आठ प्रवासी, मृतांत सहा महिलांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- एसटीबस, प्रवासी जीपची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर कंटेनर उलटल्याने आठ जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला. पुणे- बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यातील पारगाव- खंडाळा बसस्थानकाजवळ रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. मृतांत दोन पुरुष सहा महिलांचा समावेश अाहे. अवजड कंटेनर क्रेनच्या साह्याने दूर करून मृतदेह बाहेर काढावे लागले. कंटेनरचालक नवनाथ आदिनाथ गीते (रा. पनवेल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साखरेची वाहतूक करणारा एक कंटेनर (एमएच ०६ -एक्यू ९३१४) साताऱ्याहून पुण्याकडे जात होता. सातारा- पुणे रस्त्यावरील पारगाव- खंडाळा येथील बसस्थानकासमोरील पुलावरून कंटेनर जाताना त्याला ओव्हरटेक करून बस पुढे गेली. रस्त्याचा अंदाज आल्याने भरधाव कंटेनरचे चाक छोट्या पुलावरील दुभाजकाच्या कठड्यावर गेले. त्यामुळे पूल संपताच हे चाक पुन्हा रस्त्यावर येताना वाहन कोलमडले भरधाव कंटेनर नियंत्रणात आणणे चालकाला शक्य झाले नाही. याच पुलाजवळ बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासी वाहनांची वाट पाहत काही प्रवासी उभे होते. काही कळायच्या आतच हा अवजड कंटेनर या प्रवाशांच्या अंगावर कोसळला. यात आठ जण जागीच ठार झाले, तर प्रसंगावधान राखून जीव मुठीत घेऊन काही जण सुरक्षित ठिकाणी पळाल्याने ते बचावले.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी दाेन लाखांची मदत
मृतआठ प्रवाशांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. या दुर्घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेकडून त्वरित माहिती घेतली. तसेच सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना तातडीने अपघातस्थळी जाऊन तेथील परिस्थिती हाताळण्यास सांगितले. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील संबधितांना योग्य ती मदत लगेच मिळेल याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले.

क्रेनच्या साह्याने हटवला कंटेनर
अचानकघडलेल्या या भीषण अपघाताने घटनास्थळी एकच आक्रोश माजला. कंटेनर इतका अवजड होता की उपस्थित लोकांना इच्छा असूनही काहीच बचाव कार्य करता आले नाही. त्यामुळे पोलिस इतर यंत्रणांना तातडीने पाचारण करण्यात आले. मोठ्या क्रेनला आणून हा अवजड कंटेनर बाजूला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. राजेंद्र लक्ष्मण करंजे या जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतांची नावे
स्नेहाबापू वाघमारे, प्रमोद बापू वाघमारे (दोघे सेनापती दांडेकर कॉलेज पालघर), अविनाश गेडाम चंद्रपूर, शरिफा फकीर महंमद कच्छी, शबाना फक्रुद्दिन मांजोरी कच्छी, हबिबा फक्रुद्दिन कच्छी (तिघे रा. लोणंद), सलमा अयुबखान (मध्य प्रदेश) आणि अंजूम गौसिया अहमद पटेल (कण्हेरी, जि.सातारा)