आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोराच्‍या लग्‍नाच्‍या दिवशीच वडिलांचा अपघाती मृत्यू, कोल्हापुरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या अपघातात कारचा असा चुराडा झाला. - Divya Marathi
या अपघातात कारचा असा चुराडा झाला.
कोल्‍हापूर - आपल्‍या लाडक्‍या मुलाच्‍या लग्‍न दिवशीच धावपळ करत असलेल्‍या वडिलांचा अपघाती मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 8 वाजताच्‍या सुमारास शहरात घडली. त्‍यामुळे हळहळ व्‍यक्‍त केली जात आहे. ज्ञानेश्‍वर तुकाराम चौधरी (वय 65, रा. इंद्रजित कॉलनी, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे.
नेमका कसा झाला अपघात ?
> ज्ञानेश्‍वर यांचा एकुलता एक मुलगा देवदत्‍त याचे रविवारी सायंकाळी कोल्‍हापूरमध्‍येच लग्‍न होणार आहे.
> त्‍यासाठी चौधरी कुटुंबीयांनी काहीच दिवसांपूर्वी मार्केटयार्डातील शाहू सांस्कृतिक कार्यालय बूक केले.
> लग्‍नासाठी चौधरी यांच्‍या घरी दोन दिवसांपासूनच पाहुण्‍यांची गर्दी वाढली आहे.
> ज्ञानेश्‍वर यांनी रविवारी सकाळी काही पाहुण्‍यांना यांनी आपल्‍या इंडिगो गाडीतून मंगल कार्यालयात सोडले.
> परत येत असताना जाधववाडीच्या वळणावर समोर आलेल्या पादचार्‍याला चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी शेजारी थांबलेल्या ट्रकवर आदळली.
> यात त्‍यांच्‍या गाडीचा समोरील भाग ट्रकच्या खाली अडकला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, घटनास्‍थळावरच झाला मृत्‍यू... आनंद सोहळ्यावर कोसळले दु:खाचे आभाळ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)