आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Removed Muscle's Of Anger, Operation Done In Kolhapur

राग व भीतीच्या पेशी नष्ट करून राग घालवला, ब्रिटिश नागरिकावर कोल्हापुरात शस्त्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
कोल्हापूर - कायम अनावर होणारा राग, सातत्याने सतावणारी चिंता आणि सार्वजनिक ठिकाणी येणारा तणाव या असामान्य आजाराने ग्रासलेल्या एका तीस वर्षीय ब्रिटिश नागरिकाचे नकोसे झालेले जगणे पुन्हा सुसह्य झाले आहे. कोल्हापूरच्या विन्स रुग्णालयात या आजाराशी संबंधित त्याच्या मूळपेशीच नष्ट करण्यात आल्या आणि तो सामान्यपणे जगू लागला आहे.
ब्रिटनचे जॉन कॅलिवर यांना गेल्या १२ वर्षांपासून या आजाराने ग्रासले होते. रागीट स्वभावामुळे त्यांना लंडनच्या पुनवर्सन केंद्रात भरती करण्यात आले. सामान्यपणे जगता यावे म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी उपचारही घेतले. पण त्याचा फायदा झाला नाही. गेल्यावर्षी जॉनने इंटरनेटवरून कोल्हापूरच्या डॉ. संतोष प्रभू यांच्या विन्स रूग्णालयाची माहिती मिळाली. त्याने डॉ. प्रभूंशी संपर्क साधून कोल्हापूरला येण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी जुलैमध्ये डॉ. प्रभूंनी फ्रिक्वेन्सी लीजन्सच्या सहाय्याने व न्यूरोनेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली जॉनच्या क्रोध निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट केल्या. त्यानंतर जॉनला स्वभावातील फरक जाणवला.आता त्याला वाटणारी चिंता आणि सार्वजिनक ठिकाणी येणारा तणावही दूर करायचा होता. तो २० जून रोजी पुन्हा कोल्हापुरात आला आणि त्यानेही ही शस्त्रक्रियाही करून घेतली. येत्या तीन महिन्यात त्याला सतावणाऱ्या या दोन्ही समस्या नाहीशा होतील.
स्वभाव बदलला!
अमेरिका व कॅनडामध्ये चार ते पाचच ठिकाणी अशा शस्त्रक्रिया केल्या जातात. आपल्या स्वभावामध्ये बदल करण्याची सोय आधुनिक वैद्यकशास्त्राने उपलब्ध करून दिली आहे. हे आता कुठे भारतात माहीत होत आहे.
डाॅ. संतोष प्रभू, न्यूरोसर्जन, कोल्हापूर