आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्याने खुलेआम पकडला मुलीचा हात, त्यानंतर मुलीने केले त्याच्यासोबत असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या नेत्यावर मुलीची छेड काढल्याचा आरोप आहे. - Divya Marathi
या नेत्यावर मुलीची छेड काढल्याचा आरोप आहे.
कोल्हापूर/सांगली- बलात्कार आणि छेडछाडीचा आरोप असणाऱ्या एका दलित संघटनेच्या नेत्याने खुलेआम एका मुलीचा हात पकडल्याची घटना येथे घडली. त्यानंतर या प्रकाराने चिडलेल्या मुलीने आपल्या मैत्रिणींना बोलवत या नेत्याची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर या मुलीच्या चक्क पायावर पडत या नेत्याने माफी मागितली आणि माफीनामाही लिहून दिला. सतीश मोहिते असे या नेत्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

खुलेआम पकडला होता मुलीचा हात
- मंगळवारी सायंकाळी मिरज मेडिकल कॉलेजच्या बाहेर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
- आरोपी या मुलीला आपल्याबरोबर कारमध्ये घेऊन जाऊ इच्छित होता. मुलीने या विरोध केल्यावर आरोपीने तिला धमखी दिली.
- त्यानंतर मुलीने आपल्या मैत्रिणींना आवाज दिला. मुलींनी मग या नेत्याची येथेच्छ धुलाई केली.
- लाथा-चपलांनी लोकांनीही मग या नेत्याला चोपले.

मुलीची मागितली माफी
- गर्दीचे रौद्र रुप पाहून मग या नेत्याने मुलीची माफी मागितली. मुली त्याला पोलिस ठाण्यात घेऊन गेल्या. तिथे तो मुलीच्या पाया पडला.
- पोलिसांना त्याने माफीनामा लिहून दिला. मुलींनी कोणतीही तक्रार दिली नसली तरी या प्रकाराची चर्चा मात्र रंगली आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
 
 
बातम्या आणखी आहेत...