आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीतील परिषदेकडे अनेक महापौरांची पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- मुंबईबाहेर प्रथमच रविवारी भरलेल्या महापौर परिषदेकडे राज्यातील प्रमुख शहरांच्या ‘कारभा-या नी पाठ फिरवली. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील व यजमान सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांच्यातील संघर्षाची किनार असल्याने परिषदेचे अध्यक्ष व नवी मुंबईचे महापौर सागर नाईक वगळता राष्‍ट्र वादी कॉँग्रेसचा राज्यातही एकही महापौर फिरकला नाही, हे विशेष.

इद्रिस नायकवडी यांनी मागील परिषदेत ही परिषद मुंबईबाहेर भरवावी, अशी आग्रही भूमिका मांडताना सांगलीत परिषद भरवण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार सांगलीला हा मान मिळालाही; मात्र महापालिकेतील राजकीय संघर्षाचा त्यांना फटका बसला. परिषदेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते; मात्र ते येऊ शकले नाहीत. तसेच राष्ट्रवादीचे महापौर येऊ नयेत, याची पद्धतशीर ‘व्यवस्था’ करण्यात आली होती.

सागर नाईक हे परिषदेचे अध्यक्षच असल्याने त्यांना येणे भागच होते. राज्यातील एकूण 27 पैकी महापालिका आहेत. त्यापैकी नायकवडी, नाईक यांच्याशिवाय नागपूरचे महापौर अनिल सोले, ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील, जळगावच्या महापौर जयश्री दांडे आणि लातूरच्या महापौर संगीता खानापुरे यांच्यासह दोन उपमहापौर आणि दोन माजी महापौर यांचीच उपस्थिती होती. सांगली महापालिकेतील राष्ट्रवादीचे 3 ते 4 तर काँग्रेसचे मात्र 17 नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या राजकारणामुळे महापालिकांच्या प्रश्नांवर या परिषदेत निर्णायक
चर्चाच होऊ शकली नाही.
परिषदेच्या उद्घाटनाला आलेल्या केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि समारोपाला आलेल्या वनमंत्री पतंगराव कदम यांनीही महापालिकांचे प्रश्न आणि अपेक्षांवर कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.