आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठ्यांच्या राजधानीत विराट मोर्चा, पुणे-बंगळुरू हायवेवर 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयनराजे यांच्या गडात मोर्चा असल्याने त्याची उत्सूकता लागून राहिली होती. - Divya Marathi
उदयनराजे यांच्या गडात मोर्चा असल्याने त्याची उत्सूकता लागून राहिली होती.
सातारा- अहमदनगरमधील कोपर्डीत झालेल्या कथित बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा, या प्रमुख मागण्यासाठी मराठ्यांंची राजधानी असलेल्या सातार्‍यात शिवशाही एकवटली होती.

साताऱ्यातील शाहू स्टेडियमपासून या मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांंच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंंतर मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाचे वैशिष्‍ट्‍ये म्हणजे कोपर्डीतील पीडित कुटुंबीय सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे न‍िवेदन देण्यात आले.

मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातार्‍यात निघालेल्या मोर्चाला महिला, तरुणींंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील अबालवृद्धांनी देखील मोर्चात सहभाग नोंंदवला आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील , आमदार प्रभाकर घार्गे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह जिल्ह्य़ातील अनेक मान्यवर मोर्चात सहभागी झाले आहेत.

पुणे-बंगळुरु महामार्गावर 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा...
मराठा क्रांती मूक मोर्चाला सातार्‍यात सुरुवात झाली आहे. प्रचंडगर्दी या मोर्चाला झाली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या सुमारे 10 किमीपर्यंत रांगा लागल्यात. मोर्चासाठी येणारी अनेक वाहने जॉममध्ये सापडली आहेत.

दरम्यान मोर्चात उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजयशिवतारेसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सामील झाले आहेत. मोर्चासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय. शहरात 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

कराड, रहिमतपूर, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेढा आणि परळी या भागांसह पुण्याकडून काही लोक या मोर्चात सहभागी झालेत. जिल्हा परिषद मैदान, एसटी स्टॅंडमार्गे गणपत तपासेमार्गे पुढे राधिका थिएटर, समर्थ थिएररपासून मोतीचौक राजपथ मार्गे नरपरिषद आणि पोवई नाका असा मोर्चाचा मार्ग असणार आहे.
पुण्याहून येणार्‍या कारला अपघात...
मराठा महामोर्चासाठी पुण्याहून साताऱ्याला येणार्‍या कारला अपघात झाला आहे.
आणेवाडी टोल नाक्याजवळ कार पलटली. अपघातात तीन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पहाटेपासूनच जिल्ह्यातून हजारो वाहने शहरात दाखल झाले होते. सातारा जिल्ह्यात मराठा समाजाची सर्वाधिक संख्या आहे. परिणामी महामोर्चातील मोर्चकरींंचा आकडा मोठाच राहील, असा विश्वास आधीच संंयोजकांंनी व्यक्त केला आहे.

शहारात 6000 पोलिसांचा बंदोबस्त...
महामोर्चाच्या पार्श्वभूूमीवर सातारा शहरात पोलिस विभागाने सहा हजार कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यात 4 डीवायएसपी,150 वाहतूक पोलिस, 4 बॉम्बशोधक पथक, 400 बॅरिकेटस्, राज्य राखीव दलाची एक तुकडी आणि 11 ड्रोन कॅमेरे सातार्‍यात दाखल झाले आहेत.
या शहरांमध्येही निघाला होता विराट मराठा मोर्चा... फोटोज पाहाण्यााठी खालील बॉक्‍समध्‍ये करा क्‍लिक...
पुढील स्लाइडवर पाहा सातार्‍यात निघालेल्या विराट मोर्चाचा VIDEO आणि PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...