आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेकॉर्ड ब्रेक: कोल्हापुरात मराठ्यांची एकमूठ; \'राजकुमारां\'ना हद्दपार करा, संभाजीराजेंची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श समाजकार्याचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात मराठा क्रांती मूकमोर्चामध्ये शनिवारी लाखाेंचा जनसागर उसळला.

कोपर्डी प्रकरण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल, आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरात सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मूकमोर्चे काढण्यात येत आहेत. शनिवारी कोल्हापुरातही भव्य मोर्चा काढण्यात आला. यात सहभागी होण्यासाठी बेळगाव आणि इतर सीमाभागातून बांधव मोठ्या संख्येने आले होते. या मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. शहरातील गांधी मैदानावरून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली होती. गांधी मैदान, सायबर चौक, कसबा बावडा, ताराराणी चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. मोर्चामध्ये खासदार छत्रपती संभाजी राजे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांचीही उपस्थिती होती. मोर्चासाठी शहरात दीड हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.
बडोलेंना हद्दपार करा : छत्रपती संभाजीराजे
‘मराठा मोर्चांचे चुकीचे चित्रण करून महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक न्यायमंत्र्यांना राज्यातून हद्दपार करा,’ अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी या वेळी केली. ‘शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदारांना एकत्र आणले होते. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला. आता महाराष्ट्रात इतक्या चांगल्या पद्धतीने मोर्चे सुरू असताना आज कुठली तरी व्यक्ती काहीतरी बडबडतेय. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रातून हद्दपार करायला हवे,’ असे संभाजीराजे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा कोल्हापूर येथील मोर्चाचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...