आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीत एकवटली मराठ्यांची शिवशाही; हिंदु-मुस्लिम ऐक्याचे दर्शन, मुस्लिम समाजाचाही पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मूक मोर्चा शांततेत पार पडला. लाखोच्या संख्येने मराठ्यांचा जनसागर उसळला आहे. जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर राम मंदीर चौकात मोर्चाचा समारोप झाला.

दक्षिण महाराष्ट्रातील हा पहिलाच मोर्चा असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मोर्चात जिल्ह्यातील महिला-पुरुष, तरुण-तरुणी, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, तसेच विद्यार्थ्यांनी लाखोंच्या संख्यने मोर्चात सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचे संयोजकांनी सांगितले.

सांगलीत हिंदु-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
या मोर्चाचे वैशिष्ट्ये म्हणजे, हिंदु-मुस्लिम ऐक्य ‍दिसून आले. मुस्लिम बांधव मोर्चेकार्‍यांना पाणी पाऊच वाटप केले. शहरात ठिकठिकाणी मुस्लिम समाजातर्फे पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. विश्रामबाग चौक, कॉलेज कॉर्नर, शंभर फुटी, कारखाना परिसरात दहा ठिकाणी स्टॉल लावले होते.
हेही वाचा :लाखो मराठा मुली उतरल्‍या रस्‍त्यावर, पाहा असे केले मूक मोर्चाचे नेतृत्‍त्‍व

या मोर्चाचे वेगळेपण म्हणजे मोर्चात अनेक राजकीय नेते आणि त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. पण, एकही राजकीय नेता मीडियाशी संवाद साधणार नसल्याचे संयोजकांनी सांगितले होते.

मोर्चाला जाणार्‍या इनोव्हा गाडीला भीषण अपघात...
तासगाव तालुक्यातील वायफळे येथून सांगली येथेल मराठा मोर्चाला जाणार्‍या इनोव्हा गाडीला सकाळी भीषण अपघात झाला. यात दोन ठार झाले असून तीन जखमी झाले आहेत. धनाजी पाटील व भास्कर पाटील अशी मृतांची नावे आहेत. गौरगावजवळ ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाला.

मोठा पोलिस बंदोबस्त
मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 1800 पोलिस कर्मचारी, 750 होमगार्ड, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, 9 विभागीय पोलिस अधिकारी, 5 पोलिस उपअधीक्षक, असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात करण्यात आला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरातली वाहतूक सकाळी 6 पासूनच बंद करण्यात आली होती. मोर्चासाठी हजारो महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आले होते.

कर्नाटक व कोल्हापूरमधील मोर्चेकरी सांगलीत दाखल झाले होते....
सीमेवरील कर्नाटकच्या गावांमधून तसेच कोल्हापूरमधील मोर्चेकरी सांगलीत दाखल झाले होते.

आरआर आबांच्‍या कुटुंबियांचा सहभाग..
आजच्या मोर्चात राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर.पाटील अर्थात आबांचे कुटुंबिय मोर्चात सहभागी झाले होते. तसेच पतंगराव कदम, विश्वजित कदम, जयंत पाटील, खासदार संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार सहभागी झाले होते.
खालील बातम्‍यांमध्‍ये पाहा, विराट मोर्चाचे PHOTO आणि VIDEO
पुढील स्लाइडवर पाहा, दक्षिण महाराष्ट्रातील पहिला अर्थात सांगलीच्या मोर्चाचे फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...