आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Author Laxman Mane Surrender To Satara Police

शरद पवारांच्या सल्ल्यानंतर लक्ष्मण माने पोलिसांना शरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- महिलांवरील लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 15 दिवसांपासून फरार असलेले 'उपरा'कार लक्ष्मण माने सोमवारी पोलिसांना शरण आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर लक्ष्मण मानेंनी शरणागती पत्करल्याचे बोलले जात आहे.

भारतीय भटके विमुक्त विकास संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांच्याविरोधात त्यांच्याच संस्थेतील महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तसेच याबाबत एक गुन्हा दाखल झाला आहे.

"तू माझ्याशी बायकोप्रमाणे वाग, तुझा पगार वाढवतो, तुला परमनंट करतो," असे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याचे आणि जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतल्याचेही पीडित महिलांनी दाखल केलेल्या त क्रारीत म्हटले आहे. जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेत काम करणार्‍या सात महिलांनी यापूर्वी मानेंविरोधात अत्याचाराच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर माने फरार झाले होते.

दरम्यान, लक्ष्मण माने यांनी पोलिसांना शरण जाऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, असा सल्ला शरद पवार यांनी रविवारी दिला होता. माने फरार झाल्याने मानेंविरुद्ध सगळीकडे उलटसूलट चर्चेला ऊत आला आहे. त्यामुळे जनतेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. लोक त्यांच्याकडे संशयीत नजरेने पाहात असल्याचे पवारांनी सांगितले होते.