आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Kanadi Clash News In Marathi, Divya Marathi, Belgaum

कानडी पोलिसांनी चालवल्या महिला, बालकांवरही लाठ्या; बेळगावात आज बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - येळ्ळूर येथील फलक उद्ध्वस्त करण्यास विरोध करणा-या सीमा भागातील मराठी माणसाला कानडी पोलिसांनी घरात घुसून अक्षरश: अमानुष मारहाण केली. या अत्याचारी ‘रझाकारां’नी लहान मुले, महिलांनाही सोडले नाही. यामुळे सीमाभागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव, खानापूर तालुका आणि निपाणीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून सुमारे एक हजार पोलिस तैनात केले आहेत.

रविवारी सकाळी कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार पथकाने येळ्ळूरमध्ये जाऊन मराठी माणसांनी पुन्हा उभारलेला महाराष्‍ट्राचा स्तंभ जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त केला. त्याला विरोध करणा-यांवर पोलिसांनी लाठ्या चालवल्या. इतकेच नव्हे, तर गावात घुसून दिसेल त्याला झोडपण्यास सुरुवात केली. या दहशतीमुळे सर्वांनी घरांची दारे बंद करून घेतली, तेव्हा पोलिसांनी दारे व खिडक्यांच्या काचा फोडायला सुरुवात केली. घरात बसलेले नागरिक, महिला, लहान बालकांनाही चोप दिला. अभ्यास करत बसलेल्या विशाल कुगजी आणि दीपक कुगजी या मुलांना मारहाण करत फरपटत रस्त्यावर आणले. या मुलांची आजी आणि आई पोलिसांना अडवू लागल्या, तर त्यांनाही मारहाण केली.