आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक मेनंतर उर्वरित एफआरपीसाठी आंदोलन, खासदार राजू शेट्टी यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उर्वरित एफआरपीची २० टक्के रक्कम १ मेपर्यंत मिळाली नाही तर प्रसंगी कायदा हातात घेऊन मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा खणखणीत इशारा खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला.

यंदाच्या साखर हंगामाचा आढावा घेऊन शेट्टी म्हणाले, ८० टक्के एफआरपी दिली नाही म्हणून साखर आयुक्तांनी ८० कारखान्यांना नोटिसा काढल्या आहेत. उर्वरित २० टक्क्यांसाठी आता पुन्हा २९ एप्रिल रोजी बैठक बोलावली आहे. तत्कालीन परिस्थितीत कारखानदारांची दया आल्याने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने आम्ही ८०/२० चा फार्म्युला मान्य केला. मात्र, आता साखरेचे भाव वाढले आहेत. एफआरपीपेक्षा जास्त पैसे देण्याजोगी परिस्थिती असतानाही कारखानदार २० टक्क्यांसाठी टाळाटाळ करत आहेत. कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने असताना १ मेपर्यंत हे पैसे मिळाले नाहीत तर प्रसंगी कायदा हातात घेणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. राज्यातील ३५ साखर कारखाने केवळ १०७६ कोटी रुपयांना विकून दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा महाराष्ट्रात झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाणी मह‍त्‍त्‍वाचे
टंचाईच्या परिस्थितीत शासनाचे पाण्याबाबतचे प्राधान्यक्रम ठरले आहेत. उद्योगाचेही क्रम असे ठरले आहेत. परंतु प्यायला पाणी नसताना दारूच्या कारखान्यांना पाणी देण्याची गरज नाही. उद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सदाभाऊ खोत मंत्री झाले तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील, असेही शेट्टी म्हणाले.