आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता \'दूधसागर\'चे सौंदर्य पाहणे अवघड, गोवा सरकारने घातले विरजण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूर - पावसाळी पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेला दूधसागर धबधबा पाहण्‍यासाठी दरवर्षी हजारो लोक येतात. विशेष म्‍हणजे या धबधब्‍याच्‍या खालून कोकण रेल्‍वे जाते. त्‍यामुळे येथे रेल्‍वे मोठ्या संख्‍येने पर्यटक येतात. मात्र, या पुढे दूधसागर स्थानकावर रेल्वे न थांबविण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.
चेन्‍नई एक्स्प्रेसमधून आला प्रकाशझोतात
> चेन्‍नई एक्स्प्रेस या चित्रपटात हा धबधबा दाखविण्यात आला आहे.
> या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तर या पर्यटनस्थळाला भेट देणार्‍या पर्यटकांत कमालीची वाढ झाली.
> देशासह विदेशांतून पर्यटक तेथील पर्यटन अनुभवण्यास दाखल होत आहेत.
> मात्र, यावर्षीपासून दूधसागर स्थानकावर रेल्वे न थांबविण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.

गोवा सरकारने का घेतला असा निर्णय ?

> कर्नाटकमधील कॅसलरॉक आणि लोंढासह बेळगाव रेल्वे स्थानकावरून दूधसागरकडे ट्रेन येतात.
> शनिवार, रविवार या सुट्यांच्‍या दिवशात येथे प्रचंड गर्दी असते.
> रविवारच्या दिवशी एर्नाकुलमसह अन्य दोन गाड्या आणि मालगाड्यांतूनही पर्यटक दुधसागरला जातात.
> मात्र येताना गोवा एक्स्प्रेस ही एकमेव गाडी आहे. परिणामी या गाडीवर ताण पडतो.
> बर्‍याचवेळा पर्यटकांना या गाडीतून येणेही जमत नाही.
> त्यामुळे रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. त्याचाच विचार करून गतवर्षीदेखील रेल्वेमधून दूधसागरला जाण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.
> दूधसागर रेल्वे थांब्याला फलाट नाही.
> शिवाय येथे अनेक वेळा अपघातही झाला आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आता पर्यायी मार्ग काय...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)