आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंच्या प्रतिमेला काळे फासले; कोल्हापुरात शिवसेनेची जोरदार निदर्शने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यच्या निषेधार्थ कोल्हापूरात तिव्र आंदोलन करण्यात आले. '१ लाख टन तूर डाळ खरेदी करून रडतात साले' असे शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या दानवेंच्या प्रतिममेला काळे फासून शिवेसेनेच्या वतिने निषेद व्यक्त करण्यात आला. येथील शिवाजी पुतळ्यासमोर शिवसेनेच्या वतीने दानवेंविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
 
जय जवान जय किसान हा देशाचा मूलमंत्र असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत असे वक्तव्य करून दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. असे म्हणत शिवसेनेच्या वतीने आज दानवेंच्या वरोधात संताप व्यक्त केला आहे. 

निवडणुकांपूर्वी दानवे यांना शेतकऱ्यांच्या पुळका होता आणि आता मात्र शेतकऱ्यांवरचे त्यांचे प्रेम दिसत नाही. तसेच शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनांची पूर्तता करता येत नसेल तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीची चेष्टा करण्याचा हक्क दानवे यांना नाही अशी टीका शिवसेनेचे संजय पवार यांनी केली. यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस आणि शिवसैनिक उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...