आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marriage Track Accident On Kolhapur Ratnagiri Highway Five Death

वर्‍हाडाचा ट्रक उलटून पाच ठार, 25 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील खुटाळवाडीजवळ (ता. शाहूवाडी) लग्नाच्या वर्‍हाडाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले असून 25 हून अधिकजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी 4 वाजता हा अपघात घडला.

शिंपे (ता. शाहूवाडी) गावातील युवकाचा विवाह पन्हाळा तालुक्यातील केखले गावी संपन्न झाला. यानंतर हे सर्वजण गावाकडे परत येत होते. खुटाळवाडीजवळील एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वर्‍हाडाचा ट्रक उलटला. ट्रकने अनेक पलट्या घेतल्याने आतील सर्व लोक बाहेर फेकले गेले. यात चौघेजण जागीच ठार झाले असून एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

जखमींना तातडीने कोल्हापुरातील सीपीआर इस्पितळात उपचारासाठी आणण्यात आले. या ठिकाणी उपचारासाठी डॉक्टरांची धांदल उडाली असून गंभीर जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असून सर्वांना रक्तबंबाळ अवस्थेत सीपीआरमध्ये आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.