आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद नितीन कोळी अनंतात विलीन, दुधगावात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - कुपवाडा येथे पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. त्यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील दुधगावचे नितीन कोळी यांचा समावेश होता. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळगावी दुधगावमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ उल्हास आणि मुलगा देवराज यांनी शहीदाच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
यावेळी पंचक्रोशीतील लोक शहीदाला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. 'नितीन कोळी अमर रहे' आणि 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

- दुधगावमधून वाहणाऱ्या वारणा नदीच्या काठावर शहीद कोळी यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.
पत्नीला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे होते स्वप्न
- शहीद नितीन कोळी यांच्या पत्नी एम.ए. बी.एड असून लवकच सुटी घेऊन येतो आणि तिला स्वतःच्या पायावर उभे करतो, अशी इच्छा शहीद कोळी यांनी वडिलांजवळ बोलून दाखवली होती.

वडील म्हणाले- 'देशासाठी मुलगा अर्पण केला'
शहीद नितीन कोळी यांच्या वडिलांनी मी माझा मुलगा देशासाठी अर्पण केल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दुसरा मुलगाही देशाला देण्याची तयारी या वीरजवानाच्या पित्याने व्यक्त केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुलगा देवराजने दिला मुखाग्नी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...