आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे उत्साहात पार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण मंगळवारी चांदोबाचा लिंब येथे माउलींच्या गजरात व वारक-यांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडले. योगगुरू रामदेव बाबा यांनी या पालखी सोहळ्यातही हजेरी लावून माउलींचे दर्शन घेतले.


लोणंदहून मार्गस्थ झालेल्या पालखीने दुपारी तरडगाव गाठले. त्यानंतर चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणात सहभागी होण्यासाठी असंख्य भाविक जमले होते. माउलींचा सजवलेला अश्व सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. टाळ, मृदंग, हरिनामाच्या गजराने भारावलेल्या वातावरणात या अश्वाने पालखीला प्रदक्षिणा पूर्ण केली.
यावेळी भाविकांनी अश्वाचे दर्शन घेतले, त्याच्या टापाखालील माती अबीर- गुलालच्या स्वरूपात माथी लावली. रामदेवबाबाही या सोहळ्यास थांबणार होते, अशी चर्चा होती. मात्र वारकरी मंडळीबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते मार्गस्थ झाले. रिंगण सोहळ्यानंतर पालखी फलटण येथे मुक्कामी आली असून जुन्या विमानतळावर तिचा दीड दिवस मुक्काम असेल.