Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra

'शिवार संसद: बोलघेवड्या शासनाला चपराक; एक युवा चळवळ रोखतेय शेतकऱ्यांच्या आत्महत्या

समीर मुजावर | Update - Jul 24, 2017, 06:27 PM IST

‘शिवार संसद’- एक युवा चळवळ नावाची संस्था कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आली आहे आणि ही शिवार संसद गेल्या दीड दोन-वर्षांत रा

 • meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra
  कोल्हापूर- ‘शिवार संसद’- एक युवा चळवळ नावाची संस्था कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आली आहे आणि ही शिवार संसद गेल्या दीड दोन-वर्षांत राज्यभरात पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी जाऊन शेतकऱयांच्या प्रश्नांना वाचा फोडून, शेतकऱयांचे प्रबोधन करून तेथील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकांची मोठी फौज तयार करत आहे.

  एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल 300 गावात जावून या संस्थेच्या युवकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मदत मिळवून देत दिलासा देण्याचे मोठे काम करून बोलघेवड्या शासनाला चपराक देणारे कार्य करून दाखवले आहे.
  कोल्हापूरातील विनायक हेगाणा या बी.एस्सी. अॅग्रीकल्चर झालेल्या विद्यार्थ्याने सुरू केलेली ही चळवळ आता चांगलंच बाळसं धरू लागली आहे. शेतकऱयांच्या जीवाशी एकरूप होऊ लागली आहे. २०१२ साली कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विनायकने आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करू लागला. यूपीएससीचा अभ्यास करून मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारा विनायक एके दिवशी कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य सुनीलकुमार लव्हटे यांना भेटला. त्यांच्याशी चर्चा करत असतानाच प्राचार्य लव्हटे यांनी विनायकला राज्याला भेडसावणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काहीतरी उपक्रम राबवण्याचा सल्ला दिला.

  पुढील स्लाइडवर वाचा... शेतकऱ्यांच्या जीवनावर "अवकळ" नावाचा लघुपट

 • meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra
  शेतकऱ्यांच्या जीवनावर "अवकळ" नावाचा लघुपट
  विनायक तसा हळव्या आणि संवेदनशील मनाचा त्याने पटकन हा विचार उचलून धरला आणि काही दिवसात शेतकऱ्यांच्या जीवनावर "अवकळ" नावाचा लघुपट बनवला. या लघुपटाची कथा त्याने स्वतः लिहिली, चैतन्य डोंगरे या त्याच्या मित्राने चित्रीकरण आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली.या लघुपटातून या दोघांनी अलीकडेच झालेल्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी गारपीट या शेतकऱयांच्या अस्मानी संकटावर भाष्य करणारी आणि शेतकऱयांचे प्रबोधन करणारे आणि समाजातील घटकांना तसेच शासनाला सुद्धा जाग आणणारे कथानक मांडण्याचा प्रयत्न केला. यातून आपण केवळ तांत्रिक बाबीवर शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भेटून त्यांची व्यथा जाणून घेऊन अशा शेतकऱ्यांना मानसिक पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विनायकने आणखी एक पाऊल उचलले. आता विनायक "शिवार संसद"एक युवा चळवळ नावाची संस्था स्थापन करून त्या माध्यमातून हे काम करत आहे.

  पुढील स्लाइडवर वाचा... विनायक हेगाणा याने शेतकर्‍यांसाठी सुरु केली हेल्पलाइन...
 • meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra
  शेतकर्‍यांसाठी हेल्पलाइन...
  विनायकच्या या शिवार संसदच्या चळवळीचे शेतकरयांसाठी सुरु असलेल्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ''शेतकरी आत्महत्या कारणे व शाश्वत उपाय'' या पुस्तिकेला मार्गदर्शक पुस्तिका म्हणून स्वीकारली आहे.
  विनायकच्या ‘शिवार संसद’ने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 9146366407, 7350302202, 8668778100, 7768905630, 9112375398 या क्रमांकाची एक हेल्पलाईन सुरु केली आहे.
 • meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra
  या हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, वैयक्तिक, नोकरी संदर्भ, शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था, वैद्यकीय, शेती संबंधीत- पीकविमा, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, हवामान अंदाज, माती परीक्षण, निर्यात आणि माहिती तंत्रज्ञानाची इ.याबद्दलची मार्गदर्शक, माहिती, सल्ला, मदत पुरवली जाते. सर्वप्रकारची माहिती दिली जाते आणि मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर  www.shivarsansad.com ही वेबसाईट सुरू केली करण्यात आली असून संस्थेच्या कार्याबद्दल या वेबसाईटवर बरीच माहिती उपलब्ध आहे.
 • meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra
   
   घरच्या कर्त्या पुरुषाने कर्जबाजारी होवून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्यानंतर त्याच्या मागे खडतर आयुष्य कंठणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य करणाऱ्या या विनायक हेगाणा या युवकाच्या संस्थेचे कार्य आपापसात युवकांनी काढलेल्या वर्गणीमधून चालते. बोलघेवड्या शासनाने अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पुढे सरसावलेल्या युवकांना प्रोत्साहन दिल्यास महाराष्ट्रातील सर्वात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न काही अशी कां होईना नक्की सोडवण्यास मदत होईल हे मात्र तितकेच खरे आहे.
   
 • meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra
  गावातले प्रश्न गावातच सुटावेत आणि शिवारातील प्रश्न शिवारात सुटले पाहिजेत. ज्या प्रकारे देशाचे प्रश्न संसदेत मांडले जातात त्याच प्रमाणे गावच्या प्रश्नांची गावच्या लोकांसमोर मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही शिवार संसद या नावाने संस्था सुरु केली आहे.आणि या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे कार्य आम्ही करत आहोत.आत्तापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील 300 गावांपर्यंत आम्ही पोहचलो आहोत, असे ‘दिव्य मराठी’ ऑनलाइनशी बोलताना विनायक याने सांगितले.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून
  पाहा... शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपक्रम सुरु करणार्‍या विनायक हेगाणाचे फोटो... 
 • meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra
  विनायक हेगाणा यांच्या शिवार संसद कार्यक्रमात उपस्थित शेतकरी
 • meet vinayak hegana the one who is preventing farmers from suicide in maharashtra
  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत संवाद साधताना विनायक हेगाणा

Trending