आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meeting On Dary In Mumbai And Delhi : Ajit Pawar

अडचणीतील आलेल्या दूध व्यवसायाबाबत मुंबई व दिल्लीत बैठका : अजित पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोल्हापूर - अडचणीत आलेल्या दूध व्यवसायाबाबत सोमवारी मुंबईत आणि मंगळवारी दिल्लीत बैठका होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

हजारो टन दुधाची पावडर देशामध्ये शिल्लक आहे. बाहेर या पावडरला दर नसल्याने ती पडून आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांचा पूरक असलेला हा व्यवसाय अडचणीत येत आहे. म्हणून आपण सोमवारी संबंधित लोकांना मुंबईत बैठकीसाठी बोलावले आहे. तेथे राज्य सरकारशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर चर्चा होईल. तर मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावल्याने तेथे
केंद्रपातळीवरील प्रश्नांची चर्चा होईल, असे पवार यांनी सांगितले.