आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Military School Case : Mns 13 Peoples' Booked Crime,

सैनिकी शाळेतील प्रकरण : मनसेच्या 13 जणांवर गुन्हा; तिघांना कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - सैनिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी आलेल्या उत्तर भारतातील विद्यार्थी व पालकांना मारहाण करणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी तिघांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सोमवारी सकाळी भोसले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी बिहार तसेच उत्तर भारतातून आलेल्या सात- आठ जणांना मारहाण केली होती. मात्र याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नव्हती. मंगळवारी पोलिस हवालदार संदीप जाधव यांनी भोसले यांच्यासह 13 कार्यकर्त्यांविरूद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी सागर साळुंखे, अशिष जाधव आणि मनोज पवार या तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांची
पोलिस कोठडीत रवानगी केली.