आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतेज पाटलांविरोधात लाखो दुध उत्‍पादकांचा मोर्चा, गोकुळ दुध संघाची बदनामी केल्‍याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्‍हापूर- गोकुळ दुध संघावर टीका करून गोकुळची बदनामी केल्‍याप्रकरणी जिल्‍ह्यातील लाखो दुध उत्‍पादकांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्‍याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.  मोर्चात महादेवराव महाडिक, माजी आमदार पी.एन.पाटील, खासदार धनंजय महाडिक, गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील, गोकुळचे सर्व संचालक, दुध संस्‍था व दुध उत्‍पादक सहभागी झाले आहेत.

 

सतेच पाटील- धनंजय महाडिक यांच्‍यात संघर्ष

गोकुळ दुध संघावरील वर्चस्‍वावरुन कोल्‍हापूरमधील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्‍यात जोरदार संघर्ष पेटण्‍याची चिन्‍हे आहेत. तत्‍पूर्वी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात आज गोकुळ दूध संघाचे 1 लाख दूध उत्पादक मोर्चा काढणार असल्याचे सांगितले आहे. सतिश पाटील यांनी गोकुळ दूध संघावर निरर्थक आरोप करुन संघाची बदनामी केल्‍याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. याच्‍याच विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे, असे त्‍यांनी सांगितले.

 

सतेज पाटील गटाने प्रसिद्ध केले पत्रक
- आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर सतेज पाटील गटाने संचालकांविरोधात एक पत्रक प्रसिध्‍दीस दिले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, 'गोकुळच्या दुध उत्पादकांच्या हितासाठी लढा देणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्यावर टिका करण्यात धन्यता मानण्यापेक्षा आपला कारभार किती चोख आहे, हे दूध उत्पादकांना सांगण्याचे धाडस गोकुळच्या संचालकांनी दाखवावे.' हिंमत असेल तर आम्ही उपस्थित करत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मोर्चातील जनतेला द्यावीत असे आव्‍हान या पत्रकाद्वारे संचालकांना करण्‍यात आले आहे.


पत्रकामध्‍ये विचारण्‍यात आलेले प्रश्‍न
1) गोकूळ मधील १०० टॅकर कोणाचे? हे नाव व पत्यांसह जाहीर करा.

२) या टँकरना वर्षाला गोकुळकडून किती भाडे दिले जाते?
३) वासाचे व दुय्यम प्रतिचे दूध जप्त न करता ते संबधीत दूध संस्थेकडे परत पाठविण्याची व्यवस्था करण्याचे जाहीर करावे.

४) नुकत्याच झालेल्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेचे प्रोसेडींग मोर्चासमोर वाचून दाखवावे.

५) गोकुळच्या ऑडीट रिपोर्टची प्रत प्रत्येक तालूक्याच्या विकाणी सभासदांच्या माहितीसाठी उपलब्ध करून द्यावे.

६) गोकुळच्या स्कॉर्पिओ वापरणार नाही, हे मोर्चासमोर जाहीर करावे.

७) म्हैशीच्या दुधात नियमाप्रमाणे किती लिटर गायीचे दूध मिसळले जाते? हे मोर्चासमोर सांगावे.

 

सतेज पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली गोकुळवर काढयात आला होता मोर्चा
- दूध दर कपात मागे घेण्‍यात यावी या प्रमुख मागणीसाठी सतेज पाटल यांच्‍या नेतृत्‍वाखाली गोकुळवर मोर्चा काढण्‍यात आला होता. याविषयी पत्रकात म्‍हटले आहे की, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकूळ वाचविण्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. आतापर्यत गोकूळच्या जीवावर सर्व सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या तुंबडया भरल्या. कधीतरी दूध उत्पादक शेतकऱ्याला ही जादा लाभ मिळावा, असे आम्हाला वाटते. त्यास गैर काय आहे? झोपेचे सोंग घेतलेल्या या सर्व सत्ताधारी लोकांना जाग यावी व दूध दरकपात मागे घ्यावी, यासाठी आम्ही गोकुळवर मोर्चा काढला.

- मोर्चावेळी गोकुळच्या कारभाराबद्दल आमदार सतेज पाटील यांनी ऑडिट रिपोर्टचा आधार घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांची उत्तरे द्यायचे धाडस या संचालकांना कधीच होणार नाही. मोर्चाला लोक गोळा करण्यासाठी जेवढी प्रतिष्ठा या संचालकांनी पणाला लावली आहे, त्याच प्रतिष्ठेने जर संघात त्यांनी व्यापाऱ्याच्या तालावर मान डोलवली नसती तर कदाचित गोकुळ अधिक फायद्यात आला असता, असे या पत्रकात म्‍हटले अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आंदोलनाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...