आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्‍हापुरात रेव्‍ह पार्टी : कॉलगर्लसह कर्नाटकमधील मंत्र्याच्‍या पीएला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो

कोल्‍हापूर - जिल्‍ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या खडेखोळवाडी गावाच्या परिसरातील इंजोळ येथील इंदू शंकर कृषी पर्यटन केंद्रामध्‍ये सुरू असलेल्‍या रेव्‍ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकून नऊ जणांना ताब्‍यात घेतले होते. यामध्‍ये कॉलगर्लसह कर्नाटकमधील एका मंत्र्यांचा पीए आणि कर्नाटकातील चार वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्‍याचे समोर आले आहे. या सर्वांना न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, खडेखोळवाडी येथील इंदू शेखर कृषी प्रयर्टन केंद्रांमध्‍ये मंगळवारी या पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये कर्नाटकातील एका मंत्र्याचा पीए किरणसिंह राजपूत (42) यालाही अटक केली. अप्पासाहब रामागौडा पाटील या ठेकेदाराने आपले एक काम करून घेण्‍यासाठी ही पार्टी ठेवली होती. पण, कर्नाटकात आयोजन केले गेले तर पकडले जाऊ, या भीतीने राजपूत याने ती कोल्‍हापुरात घ्‍यायला लावली. पण, गुप्‍त माहितीच्‍या आधारे पोलिसांनी छाप्‍पा मारला. यात राजपूत याच्‍यासह कर्नाटकातील चार अधिकारी हे कॉलगर्लसोबत हातात दारूच्‍या बॉटल घेऊन नाचत होते आणि पैसे उधळत होते. या प्रकरणी पोलिसांनी रोख रक्‍कम दारूच्‍या बॉटल, म्यूजिक सिस्टम आणि मोबाइल फोन जप्‍त केलेत. अटक करण्‍यात आलेल्‍यामध्‍ये टीना ऊर्फ नर्मिता पंडित नावाची ओडिशातील तरुणीही आहे. ती कॉलगर्लचे रॅकेट चालवत असल्‍याचा आरोप तिच्‍यावर आहे.
पुढील स्‍लाइड्वर वाचा, रेव्‍ह पार्टी म्‍हणजे नेमके ?