आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जवसुलीसाठी सांगलीत अल्पवयीन मुलीला डांबले; काँग्रेस नेत्यासह दोघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- कर्जाच्या वसुलीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग करणा-या वाळवा तालुक्यातील हणमंत पाटील-शिरटेकर या काँग्रेसच्या नेत्यासह तिघांना इस्लामपूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.
वाळवा तालुक्यातील शिरटे येथील हणमंतराव पाटील हे सध्या इस्लामपूर शहरात राहतात. या गावातील एका सतरा वर्षीय मुलीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील मावशीला पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी पाच टक्के व्याजदराने दीड लाख रुपयांचे कर्ज दिले होते. ते परत करण्यासाठी पाटील यांनी वारंवार तगादा लावला होता. दरम्यानच्या काळात संबंधित मुलगी आपल्या मावशीकडे राहायला गेली होती. पाटील हे गुरुवारी आपले नोकर जगन्नाथ तडसलगी आणि कमल नाटेकर यांना घेऊन मावशीच्या घरी गेले आणि ‘पैसे दे नाही तर तुझ्या भाचीला घेऊन जातो’ असे धमकावले. इतकेच नव्हे तर त्यांनी संबंधित मुलीला गाडीत घालून इस्लामपूर येथे आणले आणि तिला घरात डांबून ठेवले. या प्रकरणी पोलिसात तक्रार झाल्यानंतर उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी शिरटेकर यांच्या घरावर छापा टाकून मुलीची सुटका केली आणि शिरटेकरला ताब्यात घेतले.
मंदिर उडवण्याची धमकी, एक अटकेत
सांगली - शहरातील गणपती मंदिर बॉम्बने उडवून देण्याची फोनवरून धमकी देणा-या तरुणाला पोलिसांनी एका तासात ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास संभाजी माळी (वय 30) याने पोलिस नियंत्रण कक्षातील 100 या क्रमांकावर ‘गणपती मंदिर बॉम्ब से उडा दूंगा’ अशी धमकी त्याने दिली होती.