आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Punishment News In Marathi, Ichalkarnji, Kolhapur

आमदाराच्या सक्तमजुरीला स्थगिती; वीजचोरी प्रकरणी कोर्टाचा दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- इचलकरंजीचे भाजप आमदार व त्यांचा भाऊ महादेव यांना वीजचोरी प्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या शिक्षेला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली.

इचलकरंजी शहरानजीक कोरोची येथे आमदार हाळवणकर आणि त्यांचे बंधू महादेव यांचा गणेश टेक्स्टाइल हा कारखाना आहे. येथे वीजचोरी होत असल्याबाबतची तक्रार वीज कंपनीला प्राप्त झाली होती. त्यानुसार भरारी पथकाने 6 सप्टेंबर 2008 रोजी कारखान्यावर धाड टाकून तपासणी केली असता मीटरमध्ये फेरफार केल्याचे उघडकीस आले. यानंतर तपास करून रास्ता पेठ पुणे येथे फिर्याद देण्यात आली व तेथून ती इचलकरंजी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. याबाबत तपास आणि न्यायालयीन कामकाज सुरू होऊन पहिला निकाल सत्र न्यायालयाने दिला होता. यामध्ये दोघांनाही तीन वर्षे सक्तमजुरीचीही शिक्षा ठोठावण्यात आली होती.
विधानसभेच्या तोंडावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाने हाळवणकर यांना दिलासा मिळाला आहे.