आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर राज्यांप्रमाणे पत्रकारांना निवृत्तिवेतन लागू करा, टोलमाफीही द्यावी: आमदार क्षीरसागर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना इतर काही राज्यातील पत्रकारांप्रमाणे निवृत्तिवेतन योजना लागू करावी. त्याचबरोबर वार्तांकन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या पत्रकारांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवर टोलमाफी करण्यात यावी यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
 
महाराष्ट्रात अजूनही तरतूद नाही
या विषयावर बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, कर्नाटक सरकार पत्रकारांना 8 हजार, गोवा सरकार 10 हजार, तर केरळमध्ये 10 आणि हरियाणा सरकार 8 हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देते आहे. दिल्लीमध्ये पत्रकार निवृत्तिवेतन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत तेथील सरकारने पत्रकार वेल्फेअर सोसायटी स्थापन करून निवृत्तिवेतन योजनेचे नियोजन केले आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्यापही पत्रकारांना निवृत्तिवेतन लागू नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत पावसाळी अधिवेशनापूर्वी पत्रकारांना निवृत्तिवेतन देण्याबाबत जाहीर केले होते. मात्र, अद्यापही त्याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत. त्याचबरोबर पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भाग, जिल्हाभर आणि परराज्यातसुद्धा जावे लागत असल्याने राज्यातील टोलनाक्यांवर पत्रकारांना टोलमाफी करण्यात यावी, अशी मागणी या वेळी आमदार क्षीरसागर यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...