आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Suresh Khade Fast Sold At Sangli For Bhose Lake Scheme

भाजपचे आमदार खाडेंचे उपोषण मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- भोसे तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यासाठी मार्चअखेर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी मंगळवारी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले. बुधवारी सकाळी 11 वाजता गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भोसे येथे आंदोलनाची विजयी सभा होणार आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी भोसे तलावात सोडल्यास 10 गावांचा पाणीप्रo्न सुटणार आहे. त्यासाठी 8 कोटी रुपये शासनाने तातडीने मंजूर करावेत, या मागणीसाठी भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी 1 तारखेपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जनावरे सोडल्यानंतर सरकार जागे झाले. मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत निंबाळकर यांनी भोसे तलावात पाणी सोडण्यासाठी 31 मार्चपर्यंत निधी देण्याचे लेखी आश्वासन दिले.