आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Swabhiman Organization Come For The Election

मनसे- स्वाभिमानी संघटना एकत्र निवडणूक लढणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण संघटना एकत्र लढण्याचे संकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत.


दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी संघर्ष यात्रा सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे गुरुवारी सायंकाळी ही यात्रा आली. यावेळी खोत म्हणाले, की नाकर्त्या आघाडी सरकारला धडा शिकवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मनसेशी युती करण्याचा विचार करत आहे. त्याबाबतची बोलणीही सुरू आहे. येत्या आठवड्याभरात बैठकही होईल. त्यामुळे महाराष्‍ट्राच्या राजकारणात नवी आघाडी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.