आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसे जिल्हाध्यक्षांनी फोडली अपर जिल्हाधिकार्‍यांची गाडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - मनसेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अपर जिल्हाधिकार्‍यांचे शासकीय वाहन फोडले. या प्रकरणी भोसले यांच्यासह मनविसेचे पदाधिकारी युवराज पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले.

माण-खटाव येथे चांगला पाऊस पडेपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यांना मनसेने पाठिंबा दिला आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता आंदोलन सुरू झाले, तेव्हा भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करून ‘मनसे झिंदाबाद’च्या घोषणा देत अपर जिल्हाधिकारी बी.एन.पर्‍हाड यांचे शासकीय वाहन बेसबॉल स्टिकने फोडले. या वेळी पवारही त्यांच्यासोबत होते.

‘धैर्यशील पाटील उपोषण करत आहेत, जनावरे मरायला टेकली; पण राजकारणी मंडळी निर्णयासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीची वाट पाहत आहेत. अधिकारी धरणाची कामे, वाळू ठेके यात पैसे खाण्याचे काम करत आहेत,’ असे आरोपही भोसले यांनी केले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने भोसले व पवार यांना ताब्यात घेतले.