आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक स्‍कूलमध्‍ये मारहाणप्रकरणी मनसे जिल्‍हाध्‍यक्ष भोसलेंना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/नवी दिल्‍ली- सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूलमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्‍यांना तसेच त्‍यांच्‍या पालकांना मारहाण केल्‍याप्रकरणी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्‍हाध्‍यक्ष रणजीत भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसले यांच्यासह 7 जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. दरम्‍यान, याप्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटले. दोन्‍ही सभागृहात या मुद्यावरुन काही सदस्‍यांनी गोंधळही घातला.

सैनिक स्कूलमध्ये सोमवारी प्रवेश परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. बोगस कागदपत्रांद्वारे उत्तर भारतीय विद्यार्थी प्रवेश मिळवतात असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला होता. कार्यकर्त्‍यांनी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच त्‍यांच्‍या पालकांना मारहाण केली. या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. शासकीय इमारतीत गोंधळ घातल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणाचे पडसाद लोकसभा आणि राज्‍यसभेतही उमटले. बिहारच्‍या विधानसभेतही यावरुन गदारोळ झाला. राज ठाकरेंना आवरण्‍याची मागणी बिहारी नेत्‍यांनी केली.