सातारा - बलात्कार प्रकरणात भाऊ अडकल्याने राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री व
राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या प्रकरणाचा तपास ज्येष्ठ पोलिस अधिकारी शिवशंकर यांच्याकडे देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
बलात्कार केल्याप्रकरणी शशिकांत शिंदेंचा भाऊ ऋषिकांत याला सोमवारी अटक करण्यात आली. तेव्हा हे प्रकरण जर खरे असेल तर भावाशी संबंध तोडू, अशी प्रतिक्रिया मंत्री शिंदे यांनी दिली होती. मात्र मंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्यांचे कॉल्स डिटेल्स तपासण्यात यावेत, या प्रकरणात मंत्री शिंदे यांचा हस्तेपरहस्ते सहभाग आहे का? याची तपासणी करावी, दोघांच्याही मालमत्तेची चौकशी करावी आदी मागण्याही मनसेच्या वतीने करण्यात आल्या.