आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निसर्गासोबत भटकंती; सातार्‍यात मान्सून मॅडनेस रॅली !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - साहसी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘अँडव्हेंचर इन कॉर्पोरेटेड’ या संस्थेतर्फे रविवारी आयोजित मान्सून मॅडनेस रॅलीत शेकडो उत्साही युवक दुचाकी व चारचाकींसह सहभागी झाले होते. रिमझिम पाऊस, दाट धुक्यांची मजा अनुभवत, डोंगरदर्‍यातील रस्ते, वेडीवाकडी वळणे असलेले घाट, कास -महाबळेश्वर राजमार्गावरून दिसणारे विलोभनीय देखावे, कोकण पर्यटनाचा आस्वाद देणारा, अनेक धबधब्याच्या विहंगम दृश्यांचा या वाहन‘वीरां’नी रॅलीत अनुभव घेतला.

‘हरित सातारा’चा संदेश देत अँडव्हेंचर इन कॉर्पोरेटेड संस्थेतर्फे दरवर्षी वाहनप्रेमी युवकांसाठी ही रॅली काढली जाते. आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व विक्रमसिंहराजे भोसले यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीत सातार्‍यासह पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, कराड, नाशिक, नगर, गोवा येथील उत्साही स्पर्धक सहाशे वाहनांच्या ताफ्यासह सहभागी झाले होते.

पुणे येथील रोड शेकर्स, मॅक्सफिल्ड ग्रुप, मराठा विंचर्स, कराड ग्रुप, परफेक्ट मोटर्स, कोहिनूर मोटर्स ग्रुप, सेव्ह हिल्स रायडर्स या संस्थेचे सभासद तसेच बुलेट ग्रुप, कल्पक ग्रुप पुणे या क्लबसह महाराष्ट्रातील व गोवा येथील 44 ग्रुपचे सदस्य या रॅलीत उत्साहाने सहभागी झाले होते.