आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monsoon To Start At Kolhapur, Satara Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरसह सातार्‍याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर: सोमवारी झालेल्या वळवाच्या पावसानंतर मंगळवारी सायंकाळी पावसाने पुन्हा एकदा कोल्हापूरसह सातार्‍या हजेरी लावली. या पावसामुळे परिसरात गारवा पसरला असून शेतीसाठी हा पाऊस चांगला असल्याचे कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
दुपारनंतर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र सायंकाळी सातनंतर पावसाच्या सरींनी जोर धरला. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नुकसान झाल्याची नोंद झाली नव्हती.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज, कागल, गारगोटी, मुरगूड भागातही पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी चार वाजेनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. पावसाअभावी रेंगाळलेल्या विविध शेतीकामांना वेग आल्याचेही चित्र दिसत आहे.