आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीला वा-यावर सोडणा-या माता-पित्याला साता-यात अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- चार दिवसांपूर्वी शहरातील रुग्णालयाच्या पायरीवर सापडलेल्या नवजात मुलीच्या पालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधांतून ही मुलगी जन्माला आल्याने तिला सोडण्यात आले होते. तिच्या आई-वडिलांसह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
आर्यांग्ल रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहाच्या पायºयांवर रविवारी रात्री स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले होते. राज्यात एकीकडे स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार उघडकीस येत आहेत. दुसरीकडे साताºयातही बेकायदा गर्भपाताचे प्रकार आढळले. याप्रकरणी काही डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली व मुलीच्या आईचा शोध सुरू केला होता. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात या मुलीचा जन्म झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. तिच्या आईचे नाव मनीषा संभाजी सपकाळ (28, रा. सुमनवाडी, कोडोली, सातारा) असे असून ती पतीपासून विभक्त राहते. सध्या ती औद्योगिक वसाहतीतील हॉटेल मनोजमध्ये कामाला आहे. हॉटेल मालक मनोज महाडिक याचा चुलतभाऊ विनायक सर्जेराव महाडिक याचे व मनीषाचे अनैतिक संबंध होते. या संबंधांतूनच या मुलीचा जन्म झाला. अनाथाश्रमात दाखल करतो, असे सांगून विनायकने मनीषाकडून या नवजात कन्येला घेतले व रविवारी रात्री आर्यांग्ल रुग्णालयाच्या आवारात सोडले. तत्पूर्वी शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होताना मनीषाचा पूर्वीचा पत्ता देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांना तपास करताना संभाजी सपकाळचे घर सापडले. संभाजीने मनीषाची माहिती व सध्याचा पत्ता सांगितला. त्यावरून पोलिसांनी तिचा शोध घेतला. चौकशीअंती तिने खरा प्रकार कथन केला. पोलिसांनी मनीषा, विवेक व मनोज महाडिक यांना अटक केली.