आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाने केली आईची गळा कापून हत्‍या, वडील, आजीवरही प्राणघातक हल्‍ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - आई रागावली म्‍हणून एका तरुणाने आईची हत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना जत तालुक्‍यातील बाज या ठिकाणी घडली आहे. या तरूणाने वडील आणि आजीवरही प्राणघातक हल्ला केला आहे. किरण बडगे असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत नंदाताई बडगे या 45 वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाला आहे. वडील रायाप्पा बडगे आणि आजी वैजंती बडगे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अशी घडली घटना
- काल सायंकाळी किरण घरी आला. हात-पात धुतल्‍यानंतर टॉवेलऐवजी आईच्‍या कपड्यांनी पुसले.
- यावरून आई नंदाताई या किरणला रागावल्‍या.
- राग मनात धरून किरणने मध्य रात्रीच्या दरम्‍यान खुरप्‍याने आईचा गळा कापून हत्‍या केली.
- त्यांनतर वडील व आजीवरही त्‍याने प्राणघातक हल्ला केला.
- हा तरूण मनोरूग्‍न असल्‍याची शंका वर्तवण्‍यात येत आहे.
किरणला अटक
वडील रायाप्‍पा आणि आजी वैजयंती हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. मिरज येथील शासकीय हॉस्‍पिटलमध्‍ये त्‍यांच्‍यावर उपचार करण्‍यात येत आहेत. या प्रकरणी किरण बडगे याला जत पोलिसांनी अटक केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...