आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात शाळांमध्ये होणार मातांचे औक्षण, 5 जिल्ह्यांत मातृदिनाचे आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळा-शाळांमध्ये मातांचे औक्षण होणार आहे. आईची महती शाळकरी मुलांच्या मनावर पुन्हा पुन्हा ठसावी यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाचही जिल्ह्यांत शिक्षण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमाबाबत सोमवारी कोल्हापुरात बैठक घेण्यात आली. या वेळी शिक्षण उपसंचालक व्ही. पी. पायमल, सहा. शिक्षण संचालक संपत गायकवाड, शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांची उपस्थिती होती. बदलत्या परिस्थितीमुळे शाळकरी मुले वाईट वळणाला लागल्याचे शिक्षकांच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. म्हणूनच आईच्या माध्यमातून याबाबत जागरूकता करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला या पाचही जिल्ह्यातील शाळांमध्ये मातांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यांचे शाळेमध्ये औक्षणही करण्यात येणार आहे.
आई या विषयावर निबंध स्पर्धा,
आईविषयीची व्याख्याने, कवितांचे वाचन, आईला भेटवस्तू देणे यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच या दिवशी घरातून येताना आईला वंदन करून शाळेत या, असेही आवाहन करण्यात आले आहे.