आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mothers Love Celebrate On Valentine Day In Satara Maharashtra News In Marathi

सातार्‍यातील शाळांमध्ये \'व्हॅलेंटाइन डे\'ला \'आईचे प्रेम व्यक्त करणारा दिवस\' साजरा होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' म्हणून साजरा केला जातो. मात्र, सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये या दिवशी 'आईचे प्रेम व्यक्त करणारा दिवस' साजरा केला जाणार आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेतर्फे गटशिक्षणाधिकांच्या परिपत्रक पाठवण्यात आले आहे.

देशातील काही भागात 'व्हॅलेंटाइन डे'ला विरोध केला जातो. पाश्चिमात्य संस्कृतीवर बहिष्कार टाकण्यापर्यंतचे प्रकार घडतात. त्यातून समाजात काही विघातक घटना घडतात, असे प्रकार थांबवण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेतर्फे नवा उपक्रम राबविला जात आहे.
या दिवशी सर्व शाळा तसेच महाविद्यालयात देखील आईचे वात्सल्य व्यक्त करणारी 'हंबरुन वासराले चाटती जवा गाय' ही कविता सामुहीकरित्या म्हणण्यात यावी, अशा सुचना देण्‍यात आल्या आहेत. तसेच आईचे प्रेमाचे महत्त्व विशद करणारे काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. निवडक छायाचित्रे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सातारा यांचे कार्यालयात पाठवावीत, असे आवाहन करण्‍यात आले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'हंबरुन वासराले चाटती जवा गाय' या कविता आणि सातारा जिल्हा परिषदेने शाळांना पाठवलेल्या परिपत्रकाची प्रत