आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपीठासाठी आज कोल्हापूर 'बंद'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहित शहा हे सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूरसाठी खंडपीठ जाहीर करतील अशी स्थानिक वकिलांची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्याने संतप्त वकिलांनी गुरूवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. गेली ३० वर्षे खंडपीठासाठी संघर्ष सुरू असताना गेल्या चार वर्षात या आंदोलनाने आक्रमक रूप घेतले होते. त्यामुळे न्या. मोहित शहा यांनी वारंवार सकारात्मक संकेत दिले होते. १५ ऑगस्ट रोजी वकिलांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला. मात्र यानंतर गोव्यात झालेल्या चर्चेवेळी असा प्रकार पुन्हा करण्याची वेळ येऊ नये अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहा निवृत्तीआधी कोल्हापूर खंडपीठाची घोषणा करतील असा आशावाद वकिलांसह पक्षकारांनाही होता.