आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसींविरोधात कोल्हापुरात याचिका दाखल, 31 जानेवारीला सुनावणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- ‘एमआयएम’चे हैदराबाद येथील खासदार अकबरुद्दीन सुलतान सल्लाहुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात येथील मुख्य न्यायालयात अँड. युवराज आनंदराव जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. आदिलाबाद जिल्हय़ातील एका रॅलीसमोर भाषण करताना ओवेसी यांनी हिंदूविरोधी वक्तव्ये केली होती. या प्रकरणी आता 31 जानेवारीला सुनावणी होणार आहे. अँड. जाधव म्हणाले की, सर्व मुस्लिमांना एकत्र करून हिंदूंविरोधात युद्ध करण्याची भाषा ओवेसी यांनी वापरली होती. सुमारे 1 तास 50 मिनिटे त्यांनी अतिशय प्रक्षोभक भाषण केल्याने आणि त्यामध्ये हिंदूंचा अपमान केल्यानेच आपण ही याचिका दाखल केली आहे. 31 जानेवारीला होणार्‍या सुनावणीवेळी आपण अधिक पुरावे देणार आहोत.