आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार धनंजय महाडीक यांच्या चिरंजिवांनी इंग्लंडमध्ये जिंकली फॉर्म्युला थ्री रेस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजिव कृष्णराज महाडीक यांनी ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. तब्बल 19 वर्षांनंतर एका भारतीय रेसरने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले हे विशेष. कृष्णराज यांनी सातासमुद्रापार जाऊन कोल्हापूरचा झेंडा रोवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पहिल्या रेसमध्ये कृष्णराज आठव्या स्थानावर होता. जिद्द, कौशल्य आणि समयसूचकतेच्या जोरावर सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कृष्णराजने विजेतेपदाला गवसणी घातली.

नरेन कार्तिकेयन ठरला होता विजेता...
भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयन याने 19 वर्षांपूर्वी अशी कामगिरी केली होती. त्यानंतर कृष्णराज याने विजेतेपद पटकावून ही किमया कामय ठेवली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... कृष्णराज महाडीक यांचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...