आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकार मुजोर निघाले..शेतकर्‍यांच्या जीवावर उठले; राजू शेट्टींचा घणाघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- काँग्रेसचे सरकार नको म्हणून भाजप सरकार सत्तेवर आणले. मात्र, हे सरकार तर शेतक-यांच्या जीवावरच उठले आहे,अशा शब्दात राज्य आणि केंद्रीय  सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त करुन भाजप सरकार मुजोर असल्याची जोरदार टीका आज खासदार राजू शेट्टी यांनी केली.ते सतेज कृषी प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

ते म्हणाले ज्यांनी सत्तेवर आणले त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर उठत,त्यांच्याशीच मुजोरी करण्याचा डाव या सरकारने केला आहे.शेतीसाठी लागणाऱ्या शेती अवजारांवर आणि ट्रॅक्टर ट्रॉलीवर २८ टक्के जीएसटी करप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. अशा सरकारला आता धडा शिकवावा लागेल असे सांगून ते म्हणाले कि,केंद्र सरकार ट्रॅक्टर आणि ट्रॉली हे वाहन व्यावसायिक वाहनांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ट्रॉलीवर तर ९३ हजार इतका जीएसटी लावला आहे. त्यामुळे शेतक-यांना शेती औजारे खरेदी करणे जिकीरीचे बनले आहे.

 

आज (मंगळवार) दिल्लीमध्ये अर्थमंत्री अरुण जेटलींच्या समवेत अधिवेशनापूर्वीची चर्चा होणार आहे. यामध्ये आपण शेतक-यांसाठी प्लॅस्टिक कागद, ड्रीप आणि शेती औजारांसाठी जीएसटी कर रद्द करावा अशी मागणी करणार आहे. दिवसेंदिवस शेतीचे तुकडे पडत आहेत.तळ कोकणातील शेती ओस पडू लागली आहे. कमी क्षेत्रावर शेती करण्याने उत्पादन खर्चात वाढ होते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी शेतीपासून दुरावत चालला आहे. अशातच शासनाचे शेतक-यांबाबतचे धोरण चुकत आहे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार सतेज पाटील,आ.चंद्रदीप नरके,
उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर यांचीही भाषणे झाली. माजी आमदार राजू आवळे, सुरेश साळोखे, राजूबाबा आवळे, बाबूराव हजारे, आर.के.पोवार आदी उपस्थित होते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...