आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mp Raju Shetty Complaint Agaist Priminister To Election Commission

खासदार राजू शेट्टी यांची निवडणूक आयोगाकडे पंतप्रधानांविरोधात तक्रार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- मागील लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 71 हजार कोटींची कर्जमाफी करणा-या केंद्र सरकारने चार राज्यातील शेतक-यांकडून पुन्हा वसुली सरू केली आहे. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी कर्जमाफीचे आश्वासन देऊन पंतप्रधानांनी शेतक-यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, प्रत्यक्षात 71 हजार कोटींच्या कर्जमाफीची घोषणा करून केंद्र शासनाने 2008 मध्ये 1100 कोटी रूपये कमीच दिले आहेत.

याही पुढे जाऊन महाराष्‍ट्र, मध्य प्रदेश, झारखंड आणि राजस्थान या चार राज्यांतील हजारो शेतक-या ंना पुन्हा रक्कम भरण्यासाठी नाबार्डने नोटीसा काढल्या असून ही शेतक-या ंची फसवणूक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1545 सेवा संस्थांमधून कर्ज उचललेल्या 45,666 शेतक-यांना पुन्हा रकमा भरण्यासाठी जिल्हा बॅँकांनी नोटिसा काढल्या आहेत. केवळ निवडणूक जिंकण्यासाठीच पंतप्रधानांनी ही घोषणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच याबाबत कारवाई करावी, अशी लेखी मागणी शेट्टी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.