आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार राजू शेट्टी महायुतीत येणार; मुंडेंचे निमंत्रण स्वीकारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी महायुतीत यावे, असे निमंत्रण भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे सभेसाठी मंगळवारी खासदार मुंडे आले होते. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘वेगवेगळे झेंडे, पक्ष यांच्यासोबत लढण्यापेक्षा खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना, भाजप व रिपाइंच्या महायुतीत यावे. मी स्वत: कारखानदार असलो तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला आमचा गेल्या 12 वर्षांपासून पाठिंबा राहिलेला आहे. त्यांची लढाई शेतक-यांसाठी आहे. सरकारने राज्याच्या डोक्यावर 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज केले. तसेच दुष्काळी जनतेसाठी काहीही केलेले नाही. वाळूमाफियांना पोसले आहे. त्यामुळे आता या आघाडी सरकारला आता सत्तेवरून खेचण्याची वेळ आली आहे.’
यावेळी उपस्थितीत असलेले शेट्टी म्हणाले, ‘महायुतीत येण्याची तयारी आहे, मात्र राष्ट्रीय किमान समान कार्यक्रमात आमच्या मुद्द्यांचा विचार झाला पाहिजे. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, ही आमची प्राधान्याची मागणी आहे. त्यावर विचार होणार असेल तर आम्ही महायुतीत जायला तयार आहोत.’

काँग्रेसशी युतीला तयार
मुंडे म्हणाले, ‘सांगली महापालिकेची निवडणूक आम्ही रिपाइं, जनता दल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकत्र घेऊन स्वाभिमानी आघाडी या नावाने लढवत आहे. या आघाडीत काँग्रेस यायला तयार असेल तर आम्ही त्यांच्याशीही चर्चा करू.’