आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनो पर्समधील पावडरच्या डब्यात मिरचीपूड ठेवा; सुप्रिया सुळेंचा विद्यार्थीनींना सुरक्षेचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- मुलींनो तुमच्या सुरक्षेसाठी कोणी हिरो येणार नाही, आता तुम्हालाच पर्समध्ये टाल्कम पावडरच्या डब्यात मिरचीपूड ठेवायला लागेल. असा सुरक्षेचा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविद्यालयीन तरुणींना दिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित युवा संवाद यात्रेनिमित्त त्या कोल्हापूर येथे आल्या होत्या.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, सिनेमात हिरो हिरोईनला अडचणीतून वाचवतो, तुम्हाला वाचविण्यासाठी कोणी हिरो येणार नाही. तुम्हाला स्वतःच तुमचे हिरो व्हावे लागेल. त्यासाठी पर्समधील टाल्कम पावडरच्या डब्यात मिरचीपूड ठेवा. असा सुरक्षेचा सल्ला खासदार सुळे यांनी महाविद्यालयीन तरूणींना दिला.

सदर बझार येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर अनेक विद्यर्थिनींनी रोजच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या छेडछाड प्रकरणांचा पाढा वाचला. इतकेच नव्हे तर कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांच्या प्रभागातील बस स्टॉपवरच छेडछाड होत असल्याची तक्रारही यावेळी विद्यार्थिनींनी केली. विशेष म्हणजे महापौर हसीना फरास राष्ट्रवादीच्या असल्याने सुळे यांनीही तातडीने उत्तर दिले. सबंधित बस स्टॉपवर पोलिसांना १५ दिवस लक्ष ठेवाण्याच्या सूचना महापौर पोलिसांना देतील, असा दिलासा सुप्रिया सुळे यांनी तरूणींना दिला.
बातम्या आणखी आहेत...