आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबळेश्वरमध्ये खासदार उदयनराजेंचा मोर्चा व ठिय्या आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले खाजदार छत्रपती उद्यान राजे भोसले, शेजारी नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, संतोष आखाडे, किसनशेठ शिंदे व टॅक्सी संघटना पदाधिकारी दिसत आहेत. - Divya Marathi
छायाचित्र- ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले खाजदार छत्रपती उद्यान राजे भोसले, शेजारी नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, संतोष आखाडे, किसनशेठ शिंदे व टॅक्सी संघटना पदाधिकारी दिसत आहेत.
महाबळेश्वर- महाबळेश्वर-पाचगणी परिसर पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांना भाड्याने दुचाकी उपलब्ध करून देणा-या कंपनी आणि त्याला पाठिंबा देणा-या परिवहन विभागाच्या विरोधात खासदार उद्यनराजे भोसले यांनी दंड थोपटले आहेत. या पर्यटनस्थळी टॅक्सी व टुरिस्ट गाड्या चालवून पोट भरणा-या 2000 टॅक्सीचालकांवर यामुळे उपासमारीची वेळ येणार असल्याने खासदार उदयनराजे यांनी महाबळेश्वर शहरात सोमवारी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. याला मोठा प्रतिसाद मिळाला तसेच उदयनराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा महाबळेश्वर बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, हिरालाल दर्डा या धनाड्याने त्याची श्री साईबाबा एन्टरप्राइजेस कंपनी स्थापन करीत महाबळेश्वर व पाचगणीत येणा-या पर्यटकांना दुचाकी ( मोटारसायकल ऑन रेंट) भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. याला स्थानिक टॅक्सीवाल्यांनी विरोध केला आहे. ही परवानगी देताना राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव तसेच परिवहन आयुक्तांमार्फत दर्डा यांच्या कंपनीने परवाना मिळवला आहे. दर्डा यांनी परवाना मिळताच महाबळेश्वर येथील एमटीडीसी परिसरात आपले अलिशान कार्यालय थाटले आहे. मात्र असा परवाना देणे गैर असून, परिवहन अधिका-यांना लाच देऊन परवाना घेतला असल्याचा आरोप टॅक्सीचालकांनी केला आहे. यामुळे पांचगणी- महाबळेश्वर येथील स्थानिक टॅक्सीचालकांवर उपासमारीची वेळ येणार असून, 2 हजार कुटुंबावर उघड्यावर पडणार असल्याचा दावा केला आहे.
या अन्यायाच्याविरोधात टॅक्सीचालक युनियनने खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन गा-हाणे मांडले. उदयनराजेंनी टॅक्सीचालकांना तत्काळ पाठिंबा देत महाबळेश्वर गाठले. तसेच आज मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले व परिवहन अधिका-यांचा निषेध केला.
पुढे पाहा, या मोर्चा व आंदोलनाचे फोटो...(सर्व फोटो संजय दस्तुरे)