आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Bangalore Corridor Set To Create 25 Lakh Jobs

मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरसाठी हालचाली सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - दिल्ली-मुंबई कॉरिडॉरपाठोपाठ आता मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरसाठी हालचाली सुरू झाल्या असून यासाठी सुमारे 3 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हा 1 हजार किलोमीटरचा टापू विकसित होण्यास मदत होणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतला असून याबाबत कोल्हापूर शहर, परिसरातील औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची मते त्यांनी जाणून घेतली.
दिल्ली-मुंबई कॉरिडॉरचे नियोजन केले त्याच यंत्रणेकडून आता मुंबई -बंगळुरू कॉरिडॉरसाठी सल्लागार नेमण्यासाठी टेंडर निघाले आहे. त्याआधी कोल्हापूर, सातारा, कराड, बेळगाव परिसराला नेमके काय हवे आहे याचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी भूमिका मांडताना सतेज पाटील म्हणाले, यामध्ये अवास्तव मागण्या न करता शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अपेक्षा केल्या पाहिजेत. कोणतेही नकारात्मक वातावरण तयार न होता या कॉरिडॉर योजनेतून परिसराचा फायदा करून घेण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.