आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Crime Branch Team In Kolhapur For Govind Pansare Attacked Investigation News In Marathi

कॉ. गोविंद पानसरे हल्लाप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोल्हापुरात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे हल्ल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचची टीम आज (बुधवारी) कोल्हापुरात दाखल झाली. दरम्यान, पनासरे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कृत्रिम श्वाच्छोसवास सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे, राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत या नोटीसवर उत्तर मागितले आहे.
कॉ. गोविंद पानसरे त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तथापि, त्यांच्या हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी अनेक शक्यता गृहीत धरून तपासाच्या दिशा ठरवत असून 20 टीमच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी (16 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास पानसरे दाम्पत्यावर गोळीबार झाला होता. दोघांनाही गंभीर अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्रीपर्यंत पानसरे यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. तर उमा यांच्यावरही एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पानसरे यांच्या तब्येतीत सुधारणा असून उपचाराला त्यांचा चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती मिळाली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा,पानसरेंना पत्ता विचारुन जवळून झाडल्या गोळ्या...