आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Invites For Serial Killer Searching In Kolhapur

कोल्हापूरातील सिरियल किलरच्या शोधार्थ मुंबई पोलिसांना पाचारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कोल्हापुरात भिका-यांच्या खुनाचे सत्र सुरूच असून आता आरोपींनी महिला भिका-यांना लक्ष्य केल्याचे दिसते. शहरातील रिलायन्स मॉलशेजारी बुधवारी सकाळी वृद्ध भिकारी महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्या डोक्यात जड वस्तू घातल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनांमागे सिरियल किलर असण्याचा संशय असून त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.


गेल्या चार महिन्यांतील हा दहाव्या भिका-याचा खून असून पोलिस रेकॉर्डला मात्र पाचच खुनांची नोंद झाली आहे. रिलायन्स मॉलशेजारी असलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून तिचे नाव शकुंतला महादेव जाधव असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती भीक मागूनच तिचा उदरनिर्वाह करत असे.


डॉक्टरांकडे चौकशी
या खूनसत्रामुळे शहरातून सर्व भिकारी गायब झाले आहेत. पोलिसांनी त्यांना एकत्र करून कोल्हापूरबाहेर पाठवून दिले आहे. आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले असून त्यांनी विजापूरपर्यंत धडक मारली. एखाद्या माथेफिरूचे हे कृत्य असण्याची शक्यता गृहीत धरून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील मानसोपचारतज्ज्ञांकडेही याबाबत चौकशी आहे.